Posts

  ‘पुढारी’ वर्तमानपत्राच्या ०१ जानेवारीच्या (२०२४ ) वर्धापनदिन विशेषांकाच्या ‘ वर्क - लाइफ बॅलन्स ’ या विशेष पुरवणीत   प्रसिद्ध झालेला माझा लेख   वर्क - लाइफ बॅलन्स : ‘जीविका’ आणि ‘उपजीविका’ सांभाळताना प्रा. डॉ. शिरीष शितोळे , सहयोगी प्राध्यापक ( मानसशास्त्र ), महावीर महाविद्यालय, कोल्हापूर , ई–मेल: shirishbright @ gmail. c om             जीवनशैलीतून उद्भवणाऱ्या आजारांचे वाढते प्रमाण, नात्यांमधील उसवत जाणारी वीण, व्यसनांचा सामान्य वर्तन म्हणून होणारा स्वीकार, ‘आपण कसे सुखी आहोत’ हे अहमहमिकेने दाखवणारे समाज माध्यमावरील देखावे आदी बाबी पाहिल्या की ‘करिअर’ म्हणजे नोकरी किंवा व्यवसायात आर्थिक यश मिळवणे ही समाजमान्य धारणा किती तोकडी आहे, हे ठळकपणे दिसून येते. वास्तविक ‘करिअर’ या शब्दाचा अर्थ ‘जीवनमार्ग’ असा आहे. समाधानी आणि आरोग्यदायी जीवनासाठी अर्थ (पैसा) हवाच, मात्र तो कमावला की बाकीच्या गोष्टी आपोआप येतील आणि जीवन अर्थपूर्ण होईल असा समज करून घेणे खूप घातक आहे. पैशाबरोबरच शारीरिक, भावनिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आध...
  ‘पुढारी’ वर्तमानपत्राच्या ०१ जानेवारीच्या (२०२२) वर्धापनदिन विशेषांकाच्या ‘डिजिटल लाईफ स्टाईल’ या विशेष पुरवणीत   प्रसिद्ध झालेला माझा लेख   सोशल मीडिया आणि मेंदू प्रा. डॉ. शिरीष शितोळे, मानसशास्त्र विभाग, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर E-Mail ID: shirishbright@gmail.com पहिली iGen पिढी जिच्या सामाजिक आंतरक्रिया आणि संवाद प्रामुख्याने ऑनलाईन जगात आकाराला येतात, अशी मानवी इतिहासातील पहिली किशोरवयीन पिढी आपण एकविसाव्या शतकात पाहतो आहोत. तिचे भावविश्व सोशल मिडियाने व्यापलेले आहे. या माध्यमाने देहाने दूर असणाऱ्यांना परस्परांच्या जवळ आणले. जीवनातल्या सुख-दु:खाला त्वरित व्यक्त करण्याची संधी दिली. जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटनांची माहिती २४×७ पुरवायची जबाबदारी घेतली. आणीबाणीच्या प्रसंगात तात्काळ मदतीसाठीचे मार्ग उपलब्ध करून दिले. अन्न-वस्त्र-निवारा या शारीरिक गरजांइतकीच ‘संवाद’ ही मूलभूत मानसिक गरज असल्याने ती भागवण्याची मोठीच सोय करणारा हा ‘सोशल मिडिया’ आता केवळ त्यांच्याच नाही तर प्रौढांच्याही जीवनाचा अविभाज्य घटक बनू पाहतो आहे! मात्र, छोट्या-छोट्या सुखांचे ...